Cockroach Janata Party | शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण व्यवस्थेची वाट लावली; धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीची मागणी -
राष्ट्रीय

Cockroach Janata Party | शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण व्यवस्थेची वाट लावली; धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : जेईई अँडव्हान्स्ड विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने गुरुवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिक्षणमंत्री पूर्णपणे अकार्यक्षम आहेत. त्यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेची वाट लावली. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी ‘कॉजपा’ने केली.

शिक्षण क्षेत्रात जबाबदारी सुनिश्चित करण्यात प्रधान पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा आरोप कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या डेटाच्या सुरक्षेबाबत आणि परीक्षा व्यवस्थापनाच्या सरकारच्या पद्धतींबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत, असे ते म्हणाले.

प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, उमेदवारांची माहिती उघड झाल्याची ही घटना सायबर सुरक्षेच्या उपाययोजनांची दयनीय अवस्था दर्शवते. जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांची नावे, फोन क्रमांक आणि छायाचित्रे उघड झाली आहेत. जगभरातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांचे नेतृत्व करणारे तंत्रज्ञ ज्या देशाने घडवले आहेत, त्याच देशाचे शिक्षणमंत्री आणि सरकार इतके अकार्यक्षम आहेत की, त्यांना साध्या मूलभूत व्यवस्थाही सुरक्षितपणे चालवता येत नाहीत, असे रांका म्हणाले.

आंदोलन लोकशाही मार्गानेच होईल...

६ जून रोजीचे आंदोलन हिंसक वळण घेऊ शकते, अशा सुरू असलेल्या चर्चा आणि तर्कवितर्क दूर करण्याचा प्रयत्न रांका यांनी केला. हिंसेबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. पार्टी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलने करण्याचे आवाहन करते. आम्ही लोकांना हिंसेचा मार्ग टाळण्याचे आवाहन करतो, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT