Delimitation Bill MK Stalin pudhari
राष्ट्रीय

Delimitation Bill MK Stalin: DMK च्या मागण्यांनी केंद्र सरकार टेन्शनमध्ये... स्टॅलिन म्हणतात डिलिमिटेशन बीलवर तडजोड नाही

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एमके स्टॅलिन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Anirudha Sankpal

Delimitation Bill MK Stalin: केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक संमत करून घेण्याची जय्यत तयारी एनडीएने केली आहे. यासाठी घटनेत दुरूस्ती करण्यासाठी दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. केंद्र सरकारला तमिळनाडूतील प्रमुख पक्ष डीएमकेकडून पाठिंब्याची आशा आहे. दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एमके स्टॅलिन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आज देखील आपला डिलिमिटेशन विधेयकाबाबत काही मागण्या आहेत. त्या मागण्यांवर आम्ही कायम आहोत. त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

पाठिंब्यासाठी तयार मात्र...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएमके सरकारने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना त्यांच्या मागण्या नव्या कायद्यात सामील केल्या जाणार की नाही याबाबत चिंता आहे. डीएमकेने जोपर्यंत या तरतुदींची तपासणी होत नाही तोपर्यंत याला पाठिंब्याबाबत कोणता दावा करता येणार नाही.

काय आहेत डीएमकेच्या मागण्या?

डीएमकेने सरकारसमोर पुढील २५ वर्षे 1971 च्या जनगणनेच्या आधारावर डिलिमिटेशन फ्रीज करण्यात यावे, सर्व राज्यांच्या लोकसभेच्या जागांमध्ये एकसमान ५० टक्के वाढ करण्यात यावी. यामुळे राज्यांचे प्रतिनिधित्वाचे प्रमोर्शन बदलणार नाही. डीएमकेला जर लोकसंख्येच्या आधारावर लोकसभांच्या मतदार संघांची वाढ केली तर तमिळनाडू राज्याचे नुकसान होणार आहे. या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी चांगले काम केले आहे.

लोकसभेचा नंबर गेम काय असणार?

केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयकाबाबत लोकसभाचा रस्ता पार केला तर राज्यसभेत त्यांना कोणती अडचण येणार नाही. तिथं त्यांना अजून ९ खासदारांची गरज आहे. जे पक्ष लोकसभेत सोबत येणार आहेत. त्यांचा राज्यसभेतील देखील आकडा मिळणार आहे.

मात्र सरकारला लोकसभेत विधेयक पास करण्यासाठी अजून ३६ खासदारांचे समर्थन आवश्यक आहे. सरकार दावा करत आहे की त्यांना वायएसआरसीपी आणि राकांपा (एसपी) यांच्या १२ खासदारांचे समर्थन मिळू शकते. उरलेल्या २४ खासदारांसाठी डीएमकेच्या २२ खासदारांचे समर्थन गरजेचे आहे.

लोकसभेत सध्या ५४० खासदार आहेत. दोन तृतीयांश बहुमतासाठी ३५८ खासदारांचे समर्थनाचा दावा सरकारने केला आहे. मात्र आकडेवारी पाहिली तर सरकारकडे ३२२ खासदार आहे. त्यात भाजप, तेलुगुदेसम, तृणमूल काँग्रेस (बंडखोर), शिवसेना, जदयू, लोजापा, जदएस, रालोद, जनसेवा, आजसू, अपना दल, अगप, हम, राकांपा, एसएडी, एसकेएम, युपीपीएल आणि जेडीपीएम या पक्षांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT