श्रीनगर; वृत्तसंस्था : दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाने प्रसिद्धीस आलेल्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलने ‘अन्सार इंटरिम’ नावाची नवी दहशतवादी संघटना स्थापन केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे. या संघटनेत किती सहभागी होते, सध्या किती कार्यरत आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान एनआयएपुढे निर्माण झाले आहे.
या मॉड्यूलमध्ये सहभागी असलेले डॉक्टर 2016 पासूनच कट्टरपंथी विचारांकडे ओढले गेले होते. 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाचा मुख्य सूत्रधार डॉ. उमर-उन नबी याने 2016 आणि 2018 मध्ये दहशतवादी गटात सामील होण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. अखेर एप्रिल 2022 मध्ये श्रीनगरमधील ईदगाह येथे झालेल्या एका बैठकीत मुजमिल गनी, अदील राथर आणि मौलवी इरफान यांसारख्या साथीदारांसह त्यांनी स्वतःची संघटना बांधण्याचा निर्णय घेतला. अन्सार इंटरिम असे नावे असून, तपासाधिकार्यांच्या मते अन्सार हा शब्द अल-कायदा या संघटनेशी संबंधित आहे. या संघटनेत अदील राथरला अमीर (प्रमुख), मौलवी इरफानला उपप्रमुख आणि गनी याला खजिनदार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे कंबरडे मोडले आहे. गेल्या तीन वर्षांत खोर्यात तब्बल 8,000 पेक्षा जास्त म्युल अकाऊंटस् ओळखण्यात आली असून, ती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांचा वापर देशविरोधी कारवाया आणि फुटीरतावादाला खतपाणी घालण्यासाठी केला जात असल्याची दाट शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
डॉ. उमर याचा मूळ प्लॅन दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी किंवा धार्मिक स्थळावर मोठा वाहनाद्वारे स्फोट घडवून पळून जाण्याचा होता. मात्र, श्रीनगर पोलिसांनी मुजमिल गनीला अटक केल्यामुळे उमर घाबरला आणि त्याने घाईघाईत लाल किल्ल्याबाहेर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यात त्याचा मृत्यू झाला.
1) कार्यपद्धती : या गटाने अत्यंत गोपनीयरीत्या काम करण्यासाठी स्वतःचे ऑपरेशनल कोडस् तयार केले होते. डॉ. उमर समन्वयक म्हणून काम पाहत असे.
2) फरिदाबादमधील तळ : फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठ परिसरात एका खोलीत टीएटीपीसारखी घातक स्फोटके तयार करण्याचे प्रयोग आणि प्रशिक्षण दिले जात असे.
3) अयशस्वी फिदाईन भरती : अदील राथरने जासिर नावाच्या तरुणाला आत्मघाती (फिदाईन) हल्ल्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला होता.
4) इमामाची भूमिका : शोपियान येथील माजी पॅरामेडिक आणि सध्याचा इमाम मौलवी इरफान हा या गटाचा मुख्य कट्टरपंथी होता; त्यानेच डॉक्टरांना दहशतवादाकडे वळवण्यास सुरुवात केली होती.