पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील हवेच्या तापमानाने धोकादायक श्रेणीचा निर्देशांकाने 500 'एक्यूआय' पार केले आहे. दिल्ली-एनसीआरमधील हवा अजूनही प्रदूषित आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात प्रदूषणापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. दिल्लीतील अनेक भागात एक्यूआयने 700 निर्देशांक पार केला आहे. घटते तापमान आणि हवेचा दाब कमी झाल्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढत आहे. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज (दि.18) सकाळी 8 वाजल्यापासून ग्रुप 4 चे निर्बंध लागू केले आहेत. या कालावधीत शाळा ऑनलाइन चालवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शाळेतून फक्त 10वी आणि 12वीचे वर्ग होणार आहेत.
दिल्लीमध्ये ट्रक, लोडर आणि इतर अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी असेल. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
दिल्लीतील सर्व प्रकारच्या बांधकामांवर किंवा बांधकाम पाडण्यावर बंदी असणार आहे.
याच बरोबर सम-विषम तारखांचे नियम असणार आहेत. ऑफलाईन वर्ग पूर्ण बंद असणार आहेत. यामध्ये फक्त 10 आणि 12 वीचे वर्ग सुरु असणार आहेत.
सरकारी कार्यालयात 50% उपस्थिती आणि इतर आपत्कालीन उपाय इत्यादीबाबत राज्य सरकार निर्णय घेऊ शकते.