नवी दिल्ली: दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलला शनिवारी बॉम्ब धमकीचा ई-मेल आला. बॉम्बच्या धमकीमुळे ताज पॅलेसमधील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. मात्र, नंतर दिल्ली पोलिसांनी केलेल्या व्यापक शोधानंतर ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
बॉम्ब धमकी आल्याची माहिती मिळताच, बॉम्ब निकामी पथक (बीडीएस), श्वान पथक आणि जलद प्रतिक्रिया पथक (क्यूआरटी) यासह दिल्ली पोलिसांच्या अनेक पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सखोल तपास करण्यात आला. मात्र, काहीही संदिग्ध सापडले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाला देखील बॉम्बची धमकी आली होती. मात्र, तपासानंतर ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले.