प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
राष्ट्रीय

दिल्‍लीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, तब्‍बल २ हजार कोटींचे ५६० किलो कोकेन जप्‍त!

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 560 किलोहून अधिक कोकेन जप्त केले असून, चौघांना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्‍त केलेल्‍या कोकेनची किंमत 2000 कोटींहून अधिक आहे.

दिल्‍ली पोलिसांनी दक्षिण दिल्‍लीत केलेल्‍या धडक कारवाईत ५६० किलोहून अधिक कोकेन जप्त करण्‍यात आले आहे. याची आंतरराष्‍ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 2000 कोटी रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांची पोलीस कसून चौकशी करत असून हे ड्रग्ज कोणासाठी नेण्यात आले होते, ते कोणाकडे पोहोचवले जाणार होते, या टोळीशी कोणाचे संबंध आहेत, याचा तपास दिल्‍ली पोलीस करत आहे. राजधानतील राजधानीत आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्‍ज जप्‍त करण्‍याची कारवाई आहे. तसेच दिल्लीतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कोकेन जप्ती आहे. कोकेन हे अंमली पदार्थ हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये वापरले जाणारे ड्रग आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT