दिल्ली उच्च न्यायालय File Photo
राष्ट्रीय

बलात्कार आणि संमतीने झालेले लैंगिक संबंध यात फरक करण्याची गरज

दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : बलात्कार आणि संमतीने झालेले लैंगिक संबंध यात फरक करण्याची गरज आहे, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले. न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा यांनी बलात्काराचे आरोप असलेल्या एका पुरूषाला जामीन मंजूर केला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, बलात्कार आणि संमतीने झालेले संबंध यात फरक असावा.

न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा म्हणाल्या की, कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी कायदे करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे, हे कायदेमंडळ आणि कार्यकारिणीचे कर्तव्य आहे. तर, त्यांचा गैरवापर रोखणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे. सध्याच्या काळात, कामाच्या ठिकाणी जवळीक साधल्याने अनेक वेळा सहमतीने संबंध निर्माण होतात. जे बिघडल्यानंतर गुन्हे म्हणून नोंदवले जातात. त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्याचा आणि दोन प्रौढांमधील संमतीने झालेले लैंगिक संबंध यांच्यातील फरक लक्षात घेणे योग्य ठरते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सदर पुरूषाच्या जामीन अर्जावर कारवाई करताना न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, हा खटला त्याच प्रकारात येतो, ज्यामध्ये पुरूष आणि महिलेने सहमतीने लैंगिक संबंध निर्माण केले होते. परंतु सुमारे एक वर्षानंतर, संबंध बिघडले आणि "बळजबरी आणि बलात्काराचे आरोप लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT