राष्ट्रीय

नीट परीक्षा गोंधळप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची एनटीएला नोटीस

दिनेश चोरगे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षेतील पेपर फुटीसह ग्रेस गुण आणि निकालाच्या गोंधळाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर एकत्र सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (दि.१२) राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीए) नोटीस बजावली आहे.

याप्रकरणात न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी नीट परीक्षेतील पेपरफुटी, विद्यार्थ्यांना वाढीव ग्रेस गुण देण्यासह निकालातील गोंधळ हा गंभीर प्रकार असल्याचे नमूद केले. श्रेयांशी ठाकूर, फ्लोरेज, किया आझाद, आदर्श राज गुप्ता आणि अनवद्या व्ही यांनी यासंदर्भात वेगवेगळ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT