नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
कोरोनिल टॅबलेटने कोरोना बरा होतो असा खोटा दावा करतानाच ऍलोपॅथीसंदर्भात बाबा रामदेव बदनामीकारक वक्तव्ये करीत असल्याचे सांगत दिल्ली मेडिकल असोसिएशनने (डीएमए) दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान न्यायालयाने याचिकेची दखल घेत बाबा रामदेव यांना नोटीस बजावली आहे. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्यात होईल.
'पार्च्ड' मधील न्यूड सीनसाठी राधिका आपटेने 'अशी' तयारी केली!
'सीरम' केंद्राला म्हणाले, सर्वांसाठी समान नियम असावेत
बाप तो बापच… लेकाच्या औषधांसाठी चालवली तब्बल ३०० किलोमीटर सायकल
ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषध पद्धतीवरून इंडियन मेडिकल असोसिएशन व बाबा रामदेव आमनेसामने आलेले आहेत. त्यातच हा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. दिल्ली मेडिकल असोसिएशनची याचिका दाखल करून घेतल्यानंतर न्यायालयाने 'डीएमए' ला सुनावले. तुम्ही लोकांनी न्यायालयाचा वेळ वाया घालविण्यापेक्षा कोरोनाचा इलाज शोधण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. बाबा रामदेव यांचा कोरोनिल औषधावरचा दावा खोटा असेल तर आयुष मंत्रालय त्याची दखल घेईल. तुम्ही बाबा रामदेव यांच्या दाव्यामुळे कसे काय प्रभावित होत आहात?, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
Fifty Shades : सेक्स आणि इरॉटिकमधील जगप्रसिद्ध कादंबरीचा नवा भाग
'देवमाणूस' फेम नेहा खानचा हॉट लूक, फोटोंची होतेय चर्चा (Photos)