नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जात आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संभाव्य दहशतवादी धोका लक्षात घेता दिल्ली पोलिस हाय अलर्टवर आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीन, अल कायदा व खलिस्तानी संघटनांशी संबंधित १९ वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर जारी करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टर्स जारी झाेलेले दहशतवादी विविध दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत. देशातील अनेक बॉम्बस्फोट व दहशतवादी घटनांत त्यांची नावे समोर आली आहेत. सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवतानाच सर्वसामान्यांना संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.
संभाव्य दहशतवादी धोका पाहता दिल्ली पोलिसांनी रेल्वे स्टेशन, बस स्थानके, मेट्रो स्टेशन, बाजारपेठा, ऐतिहासिक ठिकाणे व गर्दीच्या भागात सुरक्षा वाढवली आहे. अनेक ठिकाणी अतिरिक्त पोलिस बल व निमुलष्करी दल तैनात करतानाच सीसीटीव्ही पाळत, वाहनांची तपासणी व संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विशेष मोहीमही राबवली जात आहे.
पहिले मोड्यूल : इक्बाल भटकळ, रियाज भटकळ (दोघेही रा. भटकळ, कर्नाटक), जुनैद अहमद (बंगळूर), मोहसीन चौधरी (पुणे, महाराष्ट्र), मोहम्मद खालीद (आझमगड, उत्तर प्रदेश).
मोहम्मद शहीद फैजल ऊर्फ उस्ताद (बंगळूर), मोहम्मद शरजील अख्तर (संभल, उत्तर प्रदेश), मोहम्मद रेहान (सीलमपूर, दिल्ली), अबू सुफियान (चतरा, झारखंड), सय्यद मोहम्मद अर्शियान (जमशेदपूर) आणि मोहम्मद उमर (हैदराबाद).
वाधवा सिंग बब्बर, पुरुषोत्तम सिंग पम्मा आणि हरविंदर सिंग रिंदा, गुरमीत सिंग बग्गा, भूपेंद्र सिंग भिंडा (बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटना), रणजित सिंग, परमजीत सिंग पम्मा (खालिस्तान जिंदाबाद फोर्स) आणि अर्शदीप सिंग डाला (खलिस्तान टायगर फोर्स).