Sonam Wangchuk hunger strike  Pudhari
राष्ट्रीय

Sonam Wangchuk hunger strike : सोनम वाकंचुक यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, अखेर 'मेदान्ता' रुग्णालयात हलवण्यास परवानगी

वांगचुक यांनी पत्राद्वारे व्यक्त केलेल्या चिंतेचाही विचार करणे गरजेचे असल्‍याचे न्‍यायालयाने केले स्‍पष्‍ट

पुढारी वृत्तसेवा

Sonam Wangchuk hunger strike : बेमुदत उपोषणामुळे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक त्यांच्या प्रकृतीवर सतत वैद्यकीय देखरेख ठेवणे आवश्यक आहे. याबाबत सरकारी आणि खासगी दोन्ही डॉक्टरांचे एकमत झाले आहे, असे स्‍पष्‍ट करत दिल्ली उच्च न्यायालयाने आज (दि.२१) त्यांना सफदरजंग रुग्णालयातून 'मेदान्ता' रुग्णालयात हलवण्यास मंजुरी दिली. वांगचुक यांना खासगी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात यावी, अशी मागणी करणारी याचिका त्‍यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी दाखल केली होती. यावर उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली.

यापूर्वी उच्‍च न्‍यायालयाने फेटाळली होती मागणी

वांगचुक यांना खासगी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात यावी, अशी मागणी करणारी यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी दाखल केली. यापूर्वी दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाच्‍या एकलपीठाने ही मागणी फेटाळली होती. याला पुन्‍हा एकदा गीतांजली यांनी आव्‍हान दिले होते. आज दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

उच्‍च न्‍यायालयाने कोणते निरीक्षण नोंदवले?

'लाईव्‍ह लॉ'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, एम्स (AIIMS), सफदरजंग रुग्णालय आणि वांगचुक यांच्या वैयक्तिक डॉक्टरांशी चर्चा तसेच वैद्यकीय अहवालांची पाहणी केल्यानंतर न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, "एम्सच्या डॉक्टरांशी आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर, तसेच वैद्यकीय अहवाल पाहिल्यानंतर सोनम वांगचुक यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सर्व डॉक्टरांचे मत आहे. डॉ. टंडन यांच्या मतानुसार, त्यांना रुग्णालयात ठेवूनच देखरेख करावी लागेल. तसेच वांगचुक यांनी पत्राद्वारे व्यक्त केलेल्या चिंतेचाही विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या पसंतीच्या 'मेदान्ता' रुग्णालयात हलवण्याचा प्रस्ताव आम्ही देतो."

केंद्र सरकारची मेदान्तामध्ये हलवण्यास संमती

केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या वतीने उपस्थित राहिलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (सोबत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा) यांनी, वांगचुक यांना मेदान्ता रुग्णालयात हलवण्यास सरकारची कोणतीही हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले."मी सरकारशी या विषयावर चर्चा केली आहे. मेदान्ता हे एक नामांकित रुग्णालय आहे. वांगचुक यांना तेथे हलवण्यास सरकारला हरकत नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांनी स्वतःहून रुग्णालयातून डिस्चार्ज (सुट्टी) घेऊ नये," अशी अट मेहता यांनी न्यायालयासमोर मांडली.यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, वांगचुक यांना मेदान्ता रुग्णालयात दाखल केले जाईल आणि सफदरजंग रुग्णालयातील त्यांचे सर्व वैद्यकीय अहवाल व उपचारांची माहिती मेदान्ता प्रशासनाला दिली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT