जवळपास महिनाभर घरीच डांबले; हळूहळू बँक खाते रिकामे केले file photo
राष्ट्रीय

धक्कादायक! जवळपास महिनाभर घरीच डांबले; हळूहळू बँक खाते रिकामे केले

दिल्लीत डिजिटल अरेस्ट करून निवृत्त बँक अधिकार्‍याची 23 कोटींची लूट

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीत आणखी एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. गुलमोहर पार्क भागात राहणार्‍या 78 वर्षीय निवृत्त बँक अधिकार्‍याची तब्बल 23 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सायबर गुन्हेगारांनी या अधिकार्‍याला डिजिटल अटक केल्याचे भासवत जवळपास एका महिनाभर घरीच डांबून ठेवले आणि त्यांच्या बचत खात्यातील पैसे हळूहळू आपल्या खात्यांत वळवून घेतले.

4 ऑगस्ट रोजी सायबर फसवणुकीचा खेळ सुरू झाला. या दिवशी पीडित व्यक्तीला एक अनोळखी क्रमांकावरून फोन आला. स्वत:ला मुंबई पोलिस दलातील अधिकारी असल्याचे सांगणार्‍या व्यक्तीने त्यांच्यावर अमली पदार्थ तस्करी, दहशतवादाला आर्थिक मदत आणि पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. या भीतीदायक आरोपांनंतर त्यांच्याशी ‘ईडी’ (अंमलबजावणी संचालनालय) आणि ‘सीबीआय’ (केंद्रीय अन्वेषण संस्था) अधिकारी असल्याचे सांगत इतर व्यक्तींनीही संपर्क करून आणखी गंभीर आरोप केले. यामुळे हा निवृत्त अधिकारी आणखीच घाबरला.

तुमच्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत. तुम्ही या काळात घर सोडायचे नाही, असे धमकावून दबाव आणत या निवृत्त अधिकार्‍याला सायबर गुन्हेगारांनी घरातच कोंडून ठेवले. पोलिसांनी आतापर्यंत वेगवेगळ्या बँक खात्यांमधील 12.11 कोटी रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, फसवणूक केलेली रक्कम अनेक खात्यांमध्ये वळवून, देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणी रोखीने काढण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT