पुढारी ऑनलाईन डेस्क : दहशतवादी फंडिंग प्रकरणी अटकेत असलेले अवामी इत्तेहाद पक्षाचे अध्यक्ष आणि बारामुल्ला मतदारसंघाचे खासदार शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनियर रशीद (Engineer Rashid ) यांच्या नियमित जामीन अर्जावर आदेश देण्यास आज (दि.२४) दिल्ली न्यायालयाने नकार दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदर जित सिंग यांनी नकार दिला.
या प्रकरणी सध्या नियमित जामीन अर्जावर आदेश देता येणार नाही, असे स्पष्ट करत दिल्ली न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदर जीत सिंग यांनी जामीन अर्जावर आदेश देण्याची मागणी करणारा इंजिनियर रशीद यांचा अर्ज फेटाळून लावला.
2017 च्या दहशतवादी फंडिंग प्रकरणी रशीद यांना राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अटक केली होती. ते 2019 पासून तिहार तुरुंगात आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी ११ सप्टेंबर रोजी इंजिनिअर राशिद यांची तिहार तुरुंगातून जामीनावर सुटका झाली होती. यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी दिल्ली न्यायालयाने त्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. यानंतर अंतरिम जामिनाच्या मुदतीत तीनवेळा वाढही केली होती.
2017 च्या दहशतवादी फंडिंग प्रकरणी रशीद यांना राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अटक केली होती. 2019 पासून तिहार तुरुंगात होते. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीच्या तिहार तुरुंगातून त्यांची ११ सप्टेंबर रोजी अंतरिम जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. कारागृहातून जामीनावर सुटका झाली. इंजिनियर रशीद यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाने बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीच्या माजी सदस्यांशी युती करून निवडणूक लढवली होती. २०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव करून रशीद यांनी सर्वांना धक्का दिला होता.