आणखी एका AAP नेत्याला मोठा दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर Pudhari Photo
राष्ट्रीय

ब्रेकिंग न्यूज | आणखी एका AAP नेत्याला मोठा दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: आम आदमी पार्टीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना आज (दि.१८) न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात जैन यांच्या जामीन अर्जाला दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मे 2022 मध्ये अटक करण्यात आली होती, असे वृत्त 'PTI' ने दिले आहे.

दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात आज (दि.१८) जैन यांच्या नियमित याचिकेवर सुनावणी झाली. दरम्यान न्यायालयाने त्यांना ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मे 2022 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. यावेळी ते दिल्लीत केजरीवाल सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. अटकेनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे देखील वृत्तात म्हटले आहे.

न्यायालयाकडून मनीष सिसोदियांच्या जामीनाचा आधार  

जामीन मंजूर करताना, दिल्ली न्यायालयाने सत्येंद्र जैन यांच्या प्रदीर्घ नजरकैदेचा हवाला दिला तसेच मनीष सिसोदियाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत सत्येंद्र जैन यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयामध्ये मुलभूत अधिकार म्हणून जलद खटला चालवण्याच्या अधिकारावर जोर देण्यात आला आहे.

वैयक्तिक स्वातंत्र्याच्या महत्त्वावर भर

राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने जैन यांच्या जामीन अर्जावर निर्णय देताना, वैयक्तिक स्वातंत्र्याच्या महत्त्वावर भर दिला. न्यायालयाचा आदेश मुख्यत्वे मनीष सिसोदिया प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होता, ज्याने जलद खटल्याच्या अधिकाराबाबत एक आदर्श ठेवला होता.

ईडीचा जैन यांच्या जामिनाला विरोध

हा खटला चालवत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. दरम्यान जैन यांनी आधीच कोठडीत बराच वेळ घालवला आहे. नजीकच्या काळात हा खटला सुरू होण्याची शक्यता नाही. मनीष सिसोदिया खटल्यातील मापदंडांच्या आधारे सत्येंद्र जैन यांनाही जामीन मिळण्यास पात्र असल्याचे म्हणत न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना मोठा दिलासा दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT