Delhi liquor policy case
दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सीबीआयने न्‍यायालयात हजर केले.  File Photo
राष्ट्रीय

अरविंद केजरीवालांना 'सीबीआय'ने केले अटक

पुढारी वृत्तसेवा

दिल्‍लीतील कथित मद्य धोरण प्रकरणी न्‍यायालयीन काेठडीत असलेले दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने आज ( दि.२६) औपचारिकपणे अटक केली. केजरीवाल यांची न्यायालयात चौकशी करण्याची आणि त्यांच्या अटकेसाठी असलेली कागदपत्रे सादर करण्याची राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिल्यानंतर ही कारवाई करण्‍यात आली. दरम्‍यान, उच्‍च न्‍यायालयाने केजरीवाल यांच्‍या जामिनाला स्‍थगिती दिली आहे. यावर आज सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी हाेणार आहे. ( liquor policy case.)

मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना राऊस अव्हेन्यू न्यायालयातून दिलेल्या जामीनाला स्थगिती दिली. केजरीवाल यांना जामीन देण्याच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने 21 मार्च 2024 रोजी दिल्‍लीतील मद्य धोरण प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. सध्या ते तिहार कारागृहात आहेत.

SCROLL FOR NEXT