Delhi car blast |राजधानी दिल्ली तणावपूर्ण शांततेत! ( सर्व छायाचित्रेः प्रशांत वाघाये, दिल्ली ) Pudhari Photo
राष्ट्रीय

Delhi car blast |राजधानी दिल्ली तणावपूर्ण शांततेत! (पहा फोटो)

स्फोटाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्‍वाच्या ठिकाणांवर निरव शांतता

Namdev Gharal

सोमवारी दिल्ली येथे झालेल्या स्फोटानंतर नेहमी गजबजलेली दिल्लीने आज तणावपूर्ण शांतता अनुभवली. अनेक चौक महत्‍वाची ठिकाणी बंदोबस्तामूळे ओस पडली होती.

नेहरू प्लेस (कॉम्प्युटर मार्केट)

दिल्लीतील महत्वाच्या नेहरू प्लेस (कॉम्प्युटर मार्केट) भागातील सुरक्षेत वाढ करण्यात आली. पूर्ण वेळ पोलिसांची गस्त आहे.

जामा मशीद मेट्रो स्थानक

लाल किल्ला मेट्रो स्टेशनलगत असलेल्या जामा मशीद मेट्रो स्थानकावरही शुकशुकाट

सुनहरी मशीद

लाल किल्ला परिसरातील सुनहरी मशीदचा फोटो, इथेही वर्दळ खूपच कमी आहे.

लाल किल्ल्यासमोरील रस्ता 

एरवी पाय ठेवायला जागा नसलेले लाल किल्ल्यासमोरील निर्मनुष्य रस्ते

अग्निशमन दलाची वाहने तैनात 

लाल किल्ला परिसरात अग्निशमन दलाची वाहने पूर्णवेळ उभी आहेत.

मार्केट कडकडीत बंद

लाल किल्ला परिसरातील बहुतांश मार्केट कडकडीत बंद

घटनास्थळावर उपस्थित असलेले स्थानिक

घटनास्थळापासून विशिष्ट अंतरावर उभे असलेले स्थानिक रहिवासी, दुकानदार

मार्केट ओस पडले

अनेक ठिकाणची मार्केट ओस पडली होती किंवा बंद होती

जैन मंदिर

घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेले जैन मंदिर

पोलिसांकडून बॅरीकेटिंग

लाल किल्ल्यासमोरील परिसरात दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे बॅरीकेटिंग केले आहे. दिल्ली पोलिसांसह, शीघ्र कृती दल आणि अन्य महत्वाची पथके इथे तैनात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT