राष्ट्रीय

Delhi Bomb Threat : दिल्लीतील चार रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील शाळांनंतर आता रुग्णालयांना पुन्हा बॉम्बने उडवण्याच्या धमक्या आल्या आहेत. चार रूग्णालयांना आज (दि.१४) ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. यापूर्वी दिल्लीतील शाळा, रुग्णालये, विमानतळ आणि उत्तर रेल्वेच्या सीपीआरओ इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.

शाळांनाही बॉम्बने उडवण्याची धमकी वाचा ठळक मुद्दे

  • दिल्लीसह राजधानी परिसरातील जवळपास १०० शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी १ मे रोजी देण्यात आली होती.
  • पोलिसांच्या तपासानंतर शाळांना आलेला ई-मेल बनावट असल्याचे सांगितले होते.
  • गेल्या वर्षी दिल्लीतील ४ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. नंतर ती खोटी धमकी असल्याचे निष्पन्न झाले होते.
  • आज दिल्लीतील चार रुग्णालयांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. दिल्ली पोलीस या धमकीचा तपास करत आहेत.

अशोक विहारमधील दीपचंद बंधू हॉस्पिटलला आज सकाळी ९.४५ वाजता, डाबरी येथील दादा देव हॉस्पिटलला सकाळी १०.५५ वाजता, फरश बाजारातील हेडगेवार हॉस्पिटलला ११.१ वाजता आणि शाहदरा येथील जीटीबी हॉस्पिटलला सकाळी ११.१२ वाजता धमकीचा ई-मेल आला आहे. त्यानंतर पोलिसांची पथके हॉस्पिटलमध्ये रवाना झाली असून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

दिल्लीत यापूर्वीही अशा अनेक धमक्या

यापूर्वीही अशा धमक्या मिळाल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी दुपारी दिल्लीच्या २० हॉस्पिटल्स आणि उत्तर रेल्वेच्या IGI आणि CPRO कार्यालयात बॉम्बस्फोट करण्याचा ईमेल आला. संजय गांधी रुग्णालय आणि बुरारी सरकारी रुग्णालय प्रशासनाने ईमेल पाहून पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, ३ मे रोजी दिल्लीतील नांगलोई भागात बॉम्ब असल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली होती. पोलीस मुख्यालयात ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. तपासानंतर पोलिसांनी हा ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला. हा ईमेल एका अल्पवयीन व्यक्तीने पाठवला होता. पोलिसांनी त्याला पकडले होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT