Delhi bomb blast | दिल्ली बॉम्बस्फोटाचे बांगला देश कनेक्शन 
राष्ट्रीय

Delhi bomb blast | दिल्ली बॉम्बस्फोटाचे बांगला देश कनेक्शन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेने बांगलादेशातील काही व्यक्तींशी संबंधित दुवे असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अटक केलेल्या सहा आरोपींचे शेजारील देशातील साथीदारांशी संबंध असू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तथापि, या हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण आहे, हे तपासकर्त्यांना अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अटक करण्यात आलेले बहुतेक आरोपी डॉक्टर आहेत आणि ते व्हाईट कॉलर मॉड्यूलचे सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी आणि बांग्लादेशात कार्यरत असलेल्या व्यक्तींमध्ये काही संबंध असू शकतात, असे प्राथमिक निष्कर्ष सांगतात. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय बांगलादेशात, विशेषत: मागील वर्षीच्या राजकीय संकटानंतर, सक्रिय झाली आहे. आयएसआय तेथील हस्तकांसह, भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी सीमेवर प्रशिक्षण शिबिरे पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

गुप्तचर यंत्रणांची चिंता वाढली

भारतीय गुप्तचर यंत्रणांना पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या सीमावर्ती भागातील च्या उपस्थितीमुळे चिंता वाटू लागली आहे. बांगलादेश सीमेवरून अरबी, उर्दू आणि बंगाली भाषेत बिनतारी संदेश (वायरलेस कम्युनिकेशन) इंन्टरसेप्ट झाल्यानंतर ही चिंता वाढली आहे.

दिल्ली स्फोटाचा तपास करणारे अधिकारी या संभाव्य कोनातून तपास करत आहेत, परंतु त्यांना मुख्य आरोपींचा पाकिस्तानी हँडलर्सशी डिजिटल दुवा अद्याप सापडलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

सध्या तपास, देशी किंवा विदेशी, कोणती संघटना या हल्ल्यामागे आहे यावर केंद्रित आहे. अटकेतील सहा आरोपी आमिर रशीद अली, जसीर बिलाल वानी ऊर्फ दानिश, डॉ. मुझम्मिल शकील गनाई, डॉ. आदिल अहमद राथर, डॉ. शाहीन सईद आणि मुफ्ती इरफान अहमद वागे चौकशीदरम्यान स्वतःला बळी ठरलेले म्हणून भासवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दिल्ली बॉम्बस्फोटातील डॉक्टरला एके-47 रायफल देणार्‍यास अटक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास संस्थेने (एसआयए) जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवतुल हिंद च्या आंतरराज्य दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात पहिली औपचारिक अटक केली आहे. याच महिन्यात हे मॉड्यूल उघडकीस आले होते. तुफैल नियाझ नावाच्या श्रीनगरच्या रहिवासी व्यक्तीला औपचारिकपणे अटक करण्यात आली आहे. त्याने पाकिस्तानी हँडलरने दिलेली एके-47 रायफल डॉ. आदील अहमद राथरला दिली होती. त्याने मुजअनंतनागच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील लॉकरमध्ये ठेवली होती.

कट्टरतावादाची सोशल मीडियावर 2019 पासून पेरणी!

नवी दिल्ली : 10 नोव्हेंबरच्या लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटात सामील असलेल्या डॉक्टरांच्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा कट्टरतावाद 2019 मध्येच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरू झाला होता, अशी माहिती अधिकार्‍यांनी रविवारी दिली आहे.

स्फोटके जमा करण्याचे दोन वर्षांपासून कारस्थान!

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाशी जोडलेल्या फरिदाबादमधील व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. या नेटवर्कने स्फोटके आणि रिमोट ट्रिगरिंग उपकरणे गोळा करण्यासाठी सुमारे दोन वर्षे खर्च केल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT