नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ३० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यापूर्वी अजित पवार गटाने आपले ११ उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकूण ४१ उमेदवार दिल्ली विधानसभेच्या रिंगणात आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशिल आहे. यापूर्वीही महाराष्ट्राव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये अजित पवार गटाने निवडणूक लढवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जाहीर केलेल्या यादीत लक्षवेधी असलेल्या नवी दिल्ली मतदारसंघातून विश्वनाथ अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कालकाजी मतदारसंघातून जमील, चांदणी चौकातून खालीद रहमान, लक्ष्मी नगरमधून नमहा यांना उमेदवारी दिली आहे. ३० उमेदवारांमध्ये घोंडामधून महक डोगरा या केवळ १ महिला उमेदवार आहेत.