पुढारी ऑनलाईन डेस्क : Delhi elections 2025 AAP Manifesto | दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांना १५ अश्वासन दिली आहेत. जाहीरनाम्यात रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २,१०० रुपये आणि संजीवनी योजनेअंतर्गत वृद्धांसाठी मोफत उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात दिल्लीतील लोकांसाठी १५ अश्वासन देण्यात आली आहेत.
रोजगार हमी
महिला सन्मान योजना - प्रत्येक महिलेच्या खात्यात प्रतिमहिना २१०० रुपये
संजीवनी योजना- ६० वर्षांवरील लोकांसाठी मोफत उपचार
चुकीचे पाणी बिल माफ केले जाईल
२४ तास पाणीपुरवठा
युरोपसारखे रस्ते
यमुना नदीचे पाणी स्वच्छ करू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना
दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवास, भाड्यात सूट
पुजारी आणि ग्रंथीला दरमहा १८ हजार रुपये
भाडेकरूंना मोफत वीज आणि पाणी
गटार दुरुस्तीचे काम
गरिबांना नवीन रेशनकार्ड मिळण्याची सुविधा
ऑटो, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी १ लाख रुपये, मुलांसाठी मोफत कोचिंगसह जीवन आणि आरोग्य विमा मिळेल
खाजगी सुरक्षा रक्षकांना नियुक्त करण्यासाठी आरडब्ल्यूएला निधी