राष्ट्रीय

Delhi airport incident : दिल्ली विमानतळावर अकासा एअर आणि स्पाईसजेटची विमाने एकमेकांना भिडली, दोन्ही विमानांचे मोठे नुकसान

डीजीसीएने चौकशी सुरू केली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या 'टॅक्सीवे'वर (विमानांच्या हालचालीसाठीचा मार्ग) गुरुवारी दुपारी अकासा एअर आणि स्पाईसजेट कंपनीच्या दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले गेले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली. यामध्ये दोन्ही विमानांचे नुकसान झाल्यामुळे, ती सध्या उड्डाणासाठी थांबवून ठेवण्यात आली आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी साधारण २.१५ वाजता विमानतळाच्या 'टर्मिनल १' जवळ ही घटना घडली. त्यावेळी अकासा एअरचे विमान उड्डाणासाठी टॅक्सीवेवरून पुढे सरकत होते, तर स्पाईसजेटचे विमान पार्किंग स्टँडच्या दिशेने जात होते. अकासा एअरचे विमान दिल्लीहून हैदराबादसाठी उड्डाण होणार होते, तर स्पाईसजेटचे विमान लेह येथून दिल्लीला दाखल झाले होते.

डीजीसीएने चौकशी सुरू केली

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केले. या घटनेनंतर सुरक्षा मानकांचा आढावा घेतला जात असल्याचे त्यात सांगितले. ही घटना कशी घडली आणि प्रक्रियेत कोणत्या त्रुटी राहिल्या, हे निश्चित करण्यासाठी डीजीसीएने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT