दिल्ली हवा प्रदुषण File Photo
राष्ट्रीय

दिल्लीमध्ये हवा गुणवत्ता पुन्हा गंभीर श्रेणीत, ग्रॅपचा तिसरा टप्पा लागू

Delhi Pollution : राजधानीत ३६५ एक्यूआयची नोंद

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीत हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) पुन्हा एकदा 'गंभीर' श्रेणीत पोहोचला आहे. यामुळे हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्ये तात्काळ प्रभावाने श्रेणीबद्ध उपाय योजनांचा (ग्रॅप) तिसरा टप्पा लागू केला आहे.

हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने म्हटले की, दिल्लीचा एक्यूआय २८ जानेवारीला २७६ नोंदवला गेला. मात्र, २९ जानेवारी (बुधवारी) यामध्ये तीव्र वाढ दिसून आली. बुधवारी, दिल्लीत एक्यूआय ३६५ नोंदवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांतही अशाच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, असे आयोगाने आदेशात म्हटले. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, ग्रॅपचा तिसरा टप्पा ताबडतोब लागू करण्यात आला आहे. जर एक्यूआय ४०० च्या वर गेला तर, चौथा टप्पा लागू केला जाईल, असेही आयोगाने आदेशात म्हटले आहे. सर्व संबंधित संस्थांना ग्रॅपच्या नियमांचे पालन करण्यास आयोगाने सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT