dehradun mba student sells kidney pudhari
राष्ट्रीय

dehradun mba student sells kidney: एमबीएची फी भरण्यासाठी विकली किडनी... ९ लाखाची डील मिळाले फक्त ३.५० लाखच

Anirudha Sankpal

dehradun mba student sells kidney: देहरादूनच्या एका नामांकित कॉलेजमध्ये एमबीएच्या चौथ्या सेमिस्टरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कॉलेजची फी भरण्यासाठी आपली किडनी विकण्याची देखील तयारी दर्शवली होती. त्यानं यासाठी ऑपरेशन करून आपली किडनी देखील काढली. मात्र तिथंच त्याच्यासोबत धोका झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आधी या मुलाची नऊ लाखात डील फायनल झाली होती. मात्र त्यानंतर संबंधित लोकांनी फक्त सहा लाख रूपये देण्याची तयारी दर्शवली. प्रत्यक्षात ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्या खात्यात फक्त ३.५० लाख रूपयेच जमा झाले. यानंतर या विद्यार्थ्याने पोलिसांकडे तक्रार करून उरलेले पैसे देण्याची मागणी केली.

कानपूर डीसीपी वेस्ट झोन एसएम कासीम आबिदी यांनी सांगितलं की, 'आयुष कुमार हा बिहारचा समस्तीपूरचा रहिवासी आहे. तो देहरादूनमध्ये एमबीएक करतोय. त्याने पोलिसांना सांगितलं की त्याच्या कुटुंबात आई, लहान भाऊ आणि छोटी बहीण आहे. वडिलांनी काही कारणांनी आत्महत्या केली होती. त्यानं शिक्षण अर्धवट सोडावं लागेल या भीतीनं आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतला होता.

किडनी रॅकट चालवणाऱ्यांच्या संपर्कात

आयुष किडनी रॅकेट चालवणाऱ्यांच्या संपर्कात कसा आला याबाबत पोलिसांनी सांगितलं की, गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी आयुष किडनी डोनर ग्रुपशी जोडला गेला. यापूर्वी तो कर्ज काढून फी भरणार होता. मात्र त्याला कर्ज मिळालं नाही. त्यानंतर त्यानं किडनी विकण्याचा निर्णय घेतला. त्याने डॉक्टर अफजल, डॉक्टर वैभव कानपूरमध्ये घेऊन आले.

डीसीपींनी सांगितलं की आयुष हा सायबर क्राईमशी देखील संबंधित राहिला आहे. पोलिसांना त्याच्याविरूद्ध पुरावे देखील मिळाले आहेत. त्याने अनेक खोटी अकाऊंट उघडली होती.

एसीपी आशुतोष कुमार यांनी सांगितलं की तपासादरम्यान लखनौ आणि नोएडामधील काही रूग्णालयांबाबत माहिती मिळाली. इथं केस बिघडल्यानंतर रूग्णाला लखनौ आणि नोएडाच्या मोठ्या रूग्णालयात पाठवण्यात येत होतं. आता या रूग्णालयांची अवैध किडनी व्यवसायाशी काय संबंध आहे याचा तापस केला जात आहे.

किडनी खरेदी विक्री आणि अवैध किडनी ट्रान्सप्लांट रॅकेटचे भांडाफोड झाले असून पोलिसांनी आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. प्रिती अहुजांसह पाच डॉक्टर आणि एका दलाला अटक केली आहे. पोलिस अजून दोन डॉक्टरांसह चार लोकांच्या शोधात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT