पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात आज (दि.१९) पहाटे चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटना आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ढिगाऱ्यात अनेक लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही घटना पहाटे ३ च्या सुमारास घडली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. घटनास्थळी श्वान पथक, एनडीआरएफ आणि पोलिस पथके उपस्थित आहेत. बचावकार्य सुरू आहे.
शनिवारी पहाटे बहुमजली इमारत काही क्षणातच कोसळली. अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत तातडीने बचाव कार्य सुरू केले. एनडीआरएफ, डीएफएस आणि रुग्णवाहिका सेवा तात्काळ पाचारण करण्यात आल्या आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत सुमारे २० जणांना वाचवण्यात आले आहे. जखमींना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.