राष्ट्रीय

जामनगरमध्ये वेफर्स पाकिटात सापडला मृत बेडूक

Arun Patil

जामनगर, वृत्तसंस्था : पुण्यात आईस्क्रीमध्ये कापलेले बोट, उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये अमूलच्या आईस्क्रीमध्ये गोम आणि एअर इंडियाच्या विमानात प्रवाशांच्या जेवणात ब्लेड सापडल्यानंतर आता गुजरातमधील जामनगरमध्ये वेफर्सच्या पाकिटामध्ये मृत बेडूक सापडल्याने खळबळ माजली आहे. या पाकिटातील काही चिप्स चार वर्षांच्या मुलीने आणि 9 महिन्यांच्या बाळाने खाल्ले होते. सध्या दोघींची प्रकृती चांगली आहे. याबाबत तक्रारीनंतर अन्न सुरक्षा विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे. जामनगरमधील पुष्कर धाम सोसायटीमध्ये राहणार्‍या जॅस्मिन पटेल यांनी वेफर्सच्या पाकिटामध्ये मृत बेडूक सापडला असल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाला दिली. जॅस्मिनची तक्रार मिळाली असून, तिची चार वर्षांची भाची घराजवळील एका दुकानातून वेफर्सचे पाकीट घेऊन आली होती. भाची आणि जॅस्मिनच्या 9 महिन्यांच्या बाळाने पाकिटातील चिप्स खाल्ले होते. जॅस्मिनच्या भाचीलाच सडलेला बेडून पाकिटात दिसला आणि पाकीट फेकून दिले.

बॅच नंबरही काढला

मृत बेडूक सापडल्याची माहिती जॅस्मिनला मिळाल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पाकीट बालाजी वेफर्स नावाच्या कंपनीचे आहे. तक्रारीनंतर अधिकार्‍यांनी पाकिटाचे सँपल घेतले आहे. पाकिटामध्ये सडलेला बेडूक सापडल्याची माहिती समोर आली आहे. वेफर्सचे पाकीट ज्या दुकानातून खरेदी केले होते, त्या दुकानदाराची चौकशी केली असून, पाकिटाचा बॅच नंबरही काढला आहे.

SCROLL FOR NEXT