नवी दिल्ली : भारतीय हवाई क्षेत्रात 2025 हे वर्ष चिंताजनक ठरत असून, गेल्या सात महिन्यांत विमानांमधून मदतीसाठी 3 ‘मे-डे’ कॉल करण्यात आले आहेत, तर 6 वेळा विमानांचे इंजिन हवेत बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
ही धक्कादायक माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत दिली. या घटनांमुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मोहोळ यांनी सांगितले की, जानेवारी ते जुलै 2025 या कालावधीत एकूण 6 इंजिन शटडाऊन आणि 3 ‘मे-डे’ कॉलच्या घटनांची नोंद झाली आहे.