'दाना' चक्रीवादळाचा तीन राज्यावर परिणाम Pudhari Photo
राष्ट्रीय

Cyclone Dana : 'दाना' चक्रीवादळाचा तीन राज्यांवर परिणाम; विमान सेवा पुर्ववत

Cyclone Dana| पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाना चक्रीवादळाचा परिणाम आता हळूहळू दिसू लागला आहे. ओडिशा आणि बंगालमधील समुद्रात जोरदार वाऱ्यासह उंच लाटा उसळत असल्याचे दिसून येते. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन खबरदारीच्या उपायांचा आढावा घेतला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ जमिनीवर येण्याची प्रक्रिया आजही सुरूच राहणार आहे. त्याचा परिणाम तीन राज्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे ओडिशा आणि बंगालमधील 12.5 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Cyclone Dana)

Cyclone Dana | दाना चक्रीवादळामुळे 300 विमान उड्डाणे आणि 552 रेल्वे रद्द

गुरुवारी रात्री उशिरा ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचलेल्या चक्रीवादळाच्या प्रभावाखाली एकूण सात राज्ये होती. यातील तीन राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. बंगालमधील शमशेरगंज आणि फरक्का येथे वादळामुळे तीन बोटी उलटल्या असून १६ मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. भुवनेश्वर आणि कोलकाता विमानतळावरून सुमारे 300 उड्डाणे रद्द करण्यात आली. रेल्वेने एकूण 552 गाड्या रद्द केल्या आहेत.

Cyclone Dana| चक्रीवादळाची तीव्रता पुढील 1-2 तास राहील

चक्रीवादळ दानाशी संबंधित ताज्या माहितीमध्ये हवामान खात्याने म्हटले आहे की, तीव्र चक्रीवादळ 'दाना' ताशी 10 किमी वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकत आहे. शुक्रवारी पहाटे 05.30 वाजता, ते ओडिशातील धामराच्या उत्तर-वायव्येला सुमारे 20 किमी आणि भितरकनिकातील हबलीखाटी निसर्ग शिबिराच्या 40 किमी उत्तर-वायव्येस आहे.

Cyclone Dana | दुपारपर्यंत वादळाची तीव्रता कमी होईल

सध्या चक्रीवादळ ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीवर आहे. त्याची किनारपट्टीवर धडकण्याची प्रक्रिया सुरूच आहे. चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया पुढील 1-2 तास सुरू राहील. हे वादळ उत्तर ओडिशावर जवळपास पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. 25 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत दाना 'गंभीर' श्रेणीतून चक्राकार वादळात हळूहळू कमकुवत होईल अशी सर्व शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT