राष्ट्रीय

Government Order : रोज 10 मिनिटे वर्तमानपत्र वाचण्याचा शिक्षण खात्याचा आदेश, मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कर्नाटक राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये वर्तमानपत्र वाचणे अनिवार्य करणारा आदेश शालेय शिक्षण खात्याने जारी केला आहे. मुलांनी सकाळच्या प्रार्थनेवेळी रोज 10 मिनिटे वर्तमानपत्रांचे वाचन करावे लागणार आहे.

आजच्या युगात मुले अधिकवेळ मोबाईलमध्ये गुंतून राहत आहेत. डिजिटल युगात मुले सोशल मीडियावर अधिकवेळ घालवत आहेत. मोबाईलच्या वापरामुळे स्मरणशक्ती कमी होत आहे. ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे.

शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. त्यामुळे मुलांचा कल वाचनाकडे वळविण्यासाठी शिक्षण खात्याकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. रोज वर्तमानपत्रांचे वाचन केल्याने विद्यार्थ्यांना चालू घडामोडींचे ज्ञान मिळते. सामान्यज्ञान वाढते तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणे सोपे हेोते. शब्दसंग्रह, भाषाशैली आणि लेखन कौशल्यातही सुधारण्यास मदत होते. बाल हक्क संरक्षण आयोगाने शाळांमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घालावी, असे सांगितले आहे.

वर्तमानपत्रे वाचण्याचे फायदे

  • सामान्य ज्ञान वाढते. राजकारण, क्रीडा, विज्ञान, अर्थव्यवस्थे बाबत माहिती मिळते

  • भाषा सुधारते, नवीन शब्द, वाŠयरचना आणि लेखनशैली सुधारते

  • विचारशक्ती विकसित होत, निर्णयक्षमता वाढीला लागते

  • स्पर्धा परीक्षा, मुलाखतीसाठी ज्ञान मिळते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT