फेंगल चक्रीवादळ आज आणखी तीव्र होणार file photo
राष्ट्रीय

Cyclone Fengal Update | फेंगल चक्रीवादळ आज आणखी तीव्र होणार

तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. आज त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ आज तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. सध्या बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात खोल दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पंबनमध्ये जोरदार वारे वाहत आहेत. IMD नुसार, कमी दाब क्षेत्र उत्तर-वायव्येकडे सरकण्याची आणि आज चक्री वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद आहेत. फेंगल वादळाने आज चक्रीवादळाचे रूप धारण केले आहे. या चक्रीवादळाचे अनेक राज्यांवर परिणाम होणार आहेत. मात्र, याचा सर्वाधिक फटका तामिळनाडूला बसण्याची शक्यता आहे. पुढील ३ दिवस तामिळनाडूमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. फंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, विलुप्पुरमसह अन्य १५ जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. IMD ने आज तामिळनाडूच्या तीन जिल्ह्यांत आणि पुद्दुचेरीच्या एका जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे क्षेत्र फेंगल चक्री वादळात रूपांतरित झाले आहे.

फेंगल हे नाव कोणी दिले?

या वादळाला ’फेंगल’ हे नाव सौदी अरबने दिले असून, त्याचा अर्थ आक्रमक असा होतो. हिंदी महासागरात यंदाच्या वर्षभरातील हे तिसरे चक्रीवादळ आहे. जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (UNESCAP) द्वारे देखरेख केलेल्या पद्धतशीर प्रक्रियेचा भाग म्हणून चक्रीवादळ फेंगलला त्याचे नाव मिळाले. या संस्था हिंद महासागर क्षेत्रासाठी चक्रीवादळ नामकरण व्यवस्थापित करतात, ज्यात भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव आणि ओमान सारख्या देशांचा समावेश आहे. सदस्य देशांनी सादर केलेल्या पूर्व-मंजूर यादीचा भाग म्हणून 'फेंगल' नाव दिले गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT