Yuzvendra Chahal
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याने भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) प्रवेश केला असून, पक्षाच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चातील व्यापक नियुक्त्यांचा एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी ही नियुक्ती केली आहे.
यापूर्वी लेगस्पिनर चहल याने ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष अमरपाल मौर्य यांची भेट घेतली होती. मौर्य यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आलेल्या यादीत राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी इतर दोन विशेष निमंत्रित सदस्यांच्या नावांचाही समावेश आहे. यामध्ये ओडिशातील प्राध्यापक अद्वैत चरण गडनायक आणि उत्तर प्रदेशातील वकील सीमा समृद्धी कुशवाह यांचा समावेश आहे.