file photo
राष्ट्रीय

Sitaram Yechury passes away | CPM ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन

वयाच्या ७२ व्या वर्षी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे आज (दि.१२ सप्टेंबर) रुग्णालयात निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात न्यूमोनिया झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान आज वयाच्या ७२ व्या वर्षी यचुरी यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

निमोनिया संसर्ग झाल्याने एम्समध्ये उपचार

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस सीताराम येचुरी यांना न्यूमोनियासारखा आजाराने छातीत संसर्ग झाला होता. तसेच श्वास घेण्यासही त्रास झाल्याने त्यांना १९ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (AIIMS) दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज वयाच्या ७२ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

सीताराम येचुरी यांची राजकीय कारकीर्द

येचुरी १९७४ मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे सदस्य बनले. लगेच एका वर्षानंतर त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) मध्ये प्रवेश केला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) शिकत असताना आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी १९७७ ते १९८८ दरम्यान तीन वेळा जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. प्रकाश करात यांच्यासह येचुरी यांना जेएनयूमध्ये डाव्या विचारधारेचे अस्तित्व मजबूत करण्याचे श्रेय दिले जाते. त्यांनी पी. चिदंबरम यांच्यासोबत १९९६ मध्ये संयुक्त आघाडी सरकारसाठी समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला होता. २००४ मधील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT