Mahakumbh 2025 | 'गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा', महाकुंभमेळ्यात होणार 'महायज्ञ' ANI 'X'
राष्ट्रीय

'गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा', महाकुंभमेळ्यात होणार 'महायज्ञ'

Mahakumbh 2025 |1100 पुजाऱ्यांचा सहभाग, दररोज ९ तास चालणार 'महायज्ञ'

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: Mahakumbh 2025 |उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभमेळास शुभारंभ होत आहे. पुढील महिन्याहून अधिक काळ हा कुंभमेळा सुरू असणार आहे. महाकुंभमेळ्याला जगभरातून भक्तगण उपस्थित राहणार असून उत्तर प्रदेश सरकारकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रयागराज महाकुंभमेळ्यात गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा यासाठी महाकुंभमेळ्यात महायज्ञ होणार असल्याचे वृत्त 'ANI'ने दिले आहे.

महायज्ञात 1100 पुजारी होणार सहभागी

महाकुंभमेळ्यातील सर्वात मोठ्या 'यज्ञकुंड'चे ड्रोन व्हिज्युअल्स ANIने शेअर केले आहे. या महायज्ञात 1100 पुजारी सहभागी होणार आहेत. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याकडून या महायज्ञाचे आयोजन करण्यात आल्याचे 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

महिनाभर दररोज ९ तास चालणार महायज्ञ

जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या शिबिरात आयोजित करण्यात आलेल्या या मंडपात ३२४ 'कुंडे' आणि ९ 'शिखर' आहेत. हा यज्ञ महिनाभर चालणार असून, दररोज ९ तास चालणार आहे, असे देखील जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत महाकुंभमेळा

महाकुंभमेळा दर 12 वर्षांनी येत असतो. जानेवारी 2025 मध्ये कुंभमेळा आला आहे. त्यापूर्वी 2013 मध्ये कुंभमेळा पार पडला होता. प्रयागराज शहरात महाकुंभमेळा 2025 ची तयारी पूर्ण क्षमतेने सुरू आहे. प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी कालावधीत महाकुंभमेळा हाेणार आहे.

'नागा साधू'  महाकुंभमेळ्याचे आकर्षण

भारतातील चार पवित्र नद्या आणि चार तीर्थस्थानांवर आयोजित केला जातो. 2025मध्ये 13 जानेवारीला पौष पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे. त्याचा समारोप 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी होईल. 12 वर्षानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ होणार आहे. शाही स्नानांचे महत्त्वपूर्ण दिवस पौष पौर्णिमा, मकर संक्रांती, मौनी अमावस्या, वसंत पंचमी आणि महाशिवरात्री आहेत. यापूर्वी 2013मध्ये प्रयागराजला महाकुंभ मेळावा पार पडला होता. नागा साधू या कुंभ मेळ्याला हजेरी लावतात. नागा साधू या मेळाव्याचं खास आकर्षण आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT