Covid-19 New Variants 2025 Cnava
राष्ट्रीय

COVID-19 in India : चिंताजनक..! देशात कोरोना संसर्गाचा वेग वाढला

सक्रिय रुग्‍णसंख्‍या चार हजारच्‍या जवळ, दिल्लीत सर्वाधिक ४७ रुग्णांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

COVID-19 in India : मागील काही दिवसांपासून देशातील विविध राज्‍यांमध्‍ये कोरोना संसर्ग वाढल्‍याचे चित्र आहे. आज (दि. २ जून) सकाळी सकाळी ८:०० वाजेपर्यंत देशात कोरोनाचे सक्रिय रुग्णांची संख्या ३९६१ वर पोहोचली. तसेच यावर्षी संसर्गामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या ३२ झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, मागील दिवसाच्या तुलनेत सक्रिय रुग्णांच्या संख्येत २०३ ची वाढ झाली आहे, तर मागील २४ तासांमध्‍ये चौघांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, रविवारपासून दिल्लीत सर्वाधिक ४७ रुग्णांची नोंद झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ४४, केरळमध्ये ३५, महाराष्ट्रात २१, गुजरातमध्ये १८ आणि कर्नाटकात १५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशबद्दल रविवारपासून येथे आठ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राजस्थानमध्ये सात, मध्य प्रदेशात चार, बिहारमध्ये तीन आणि छत्तीसगडमध्ये एक रुग्ण आढळला आहे.

दिल्ली, केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू

रविवारपासून दिल्ली, केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका कोरोना रुग्‍णाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिला फुफ्फुसांशी संबंधित आजार होता. तामिळनाडूमध्ये २५ वर्षीय पुरुषाला दम्यासारखे आजार होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ४४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्याला कोरोनासह इतर आजारही होते. केरळकडून सविस्तर माहितीची वाट पाहत आहे.

'कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र पूर्णपणे तयार'

यापूर्वीकेंद्रीय आरोग्य आणि आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी आश्वासन दिले होते की, केंद्र कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.आमचा केंद्रीय आरोग्य विभाग आणि आयुष मंत्रालय पूर्णपणे सतर्क आहे आणि सर्व राज्यांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आरोग्य आणि आयुष सचिव तसेच इतर संबंधित मंत्र्यांशी बोललो आहोत. मागील कोविड-१९ लाटेदरम्यान विकसित केलेल्या पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे. सरकार कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू आहे.

कर्नाटक आरोग्य विभागाने परिपत्रक केले जारी

कर्नाटक आरोग्य विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये सरकारी आणि खाजगी शाळांना शालेय मुलांच्या आरोग्याच्या हितासाठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, जर शालेय मुलांना ताप, खोकला, सर्दी आणि इतर लक्षणे दिसली तर त्यांना शाळेत पाठवू नका. डॉक्टरांनी सांगितलेल्या योग्य उपचार आणि काळजीच्या उपायांचे पालन करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT