राष्ट्रीय

‘आप’च्‍या मंत्री अतिशी यांना समन्‍स, केजरीवाल म्‍हणतात, अटक करण्याचे षडयंत्र

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्लीचे शिक्षण मंत्री आतिशी यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने आतिशीला समन्स बजावले आहे. त्‍यांना २९ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने हे समन्स बजावले आहे.

भाजप नेते आणि नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपच्‍या उमेदवार बन्सुरी स्वराज म्हणाले की, दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी कोणताही युक्तिवाद न करता आणि कोणत्याही पुराव्याशिवाय पक्षावर 'ऑपरेशन लोटस'सारखे घृणास्पद आरोप केले. त्यानंतर प्रवीण शंकर कपूर यांच्या वतीने आतिशी यांच्‍याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.

अटक करण्याचे षडयंत्र : मुख्यमंत्री केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या X खात्यावर लिहिले, मी यापूर्वीच सांगितले होते की केंद्र सरकार आता आतिशी यांना अटक करतील. ते आता आतिशीला अटक करण्याचा कट रचत आहेत. ही पूर्ण हुकूमशाही आहे. ते तुमच्या सर्व नेत्यांना एक एक करून खोट्या केसेसमध्ये अटक करत आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर प्रत्येक विरोधी नेत्याला अटक केली जाईल, असेही केजरीवाल यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे.

SCROLL FOR NEXT