दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरउच्च न्यायालयात सुनावणी झाली FIle Photo
राष्ट्रीय

केजरीवालांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढ

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील सीबीआय प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ८ ऑगस्‍टपर्यंत वाढ करण्‍यात आली आहे. आज तिहार कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

याआधी १२ जुलै रोजी सीबीआयमार्फत तपास करत असलेल्या अबकारी धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत शुक्रवारी २५ जुलैपर्यंत वाढ केली होती.

केजरीवाल यांनी केंद्रीय अन्वेषण विभागा (सीबीआय) ने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी राखून ठेवला आहे. केजरीवाल यांनी त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण पुरावे उपलब्ध झाल्यानंतरच कायद्यानुसार अटक करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनीही केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT