राष्ट्रीय

कोरोना : जूनअखेर राज्यांना १० कोटी डोसेस मिळणार!

Pudhari News

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

येत्या जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेशांना कोरोनावरील १० कोटी डोसेस प्राप्त होतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी बुधवारी दिली. सफदरजंग रुग्णालयातील कोरोना उपचार तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री हर्षवर्धन म्हणाले, डीआरडीओच्या मदतीने कमी वेळेत नवा पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात आला असून २ मेट्रिक टन क्षमतेचा आणखी एक प्रकल्प लवकरच उभारला जाणार असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली. सीएसआयआरच्या सहकार्याने ४६ बेडचे तात्पुरते हॉस्पिटल उभारले जात आहे. याठिकाणी ३२ आयसीयु बेड असतील तर १४ ऑक्सिजन बेड असतील, असं त्यांनी सांगीतले. 

ते एका दिवसात वीस लाखांपेक्षा जास्त कोरोनावरील चाचण्या घेण्याचा नवा विक्रम मंगळवारी झाला आहे. ही संख्या लवकरच २५ लाखांवर नेली जाणार आहे. लसीच्या पुरवठ्याचा विचार केला तर १ मे ते १५ जून या कालावधीत राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना ५ कोटी ८६ लाख २९ हजार डोसेसचा पुरवठा केला जाणार आहे. याशिवाय राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशानी थेट कंपन्याकडून ४ कोटी ८७ लाख ५५ हजार डोसेसची ऑर्डर दिली आहे. थोडक्यात जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यांना १० कोटी डोसेस प्राप्त होणार आहेत.

एम्स रुग्णालयांतील तयारी वाढविली

दरम्यान गेल्या काही काळात एम्स रुग्णालयांतील तयारी वाढविण्यात आली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. देशभरातील १२ एम्स रुग्णालयात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात १३०० ऑक्सिजन बेड तसेच ५३० आयसीयू बेड वाढविण्यात आले आहेत. यानंतर एम्स रुग्णालयातील एकूण ऑक्सिजन व आयसीयु बेडची संख्या १९०० व ९०० वर गेली आहे. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत (पीएमएसएसवाय) २२ रुग्णालये मंजूर करण्यात आली असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

'पण नितीन गडकरीजी तुमचे बॉस ऐकणार का'?

कोरोनावर 2-DG औषध निर्णायक ठरणार? 

केजरीवालांवर भडकले परराष्ट्र मंत्री जयशंकर, द्वितीय संबंधांवर 'अशी' विधाने करू नका

SCROLL FOR NEXT