Elephant Fight 
राष्ट्रीय

Elephant Fight | कर्नाटकातील कुर्ग येथे दोन हत्तींच्या भांडणात पर्यटक महिलेचा चिरडून मृत्‍य, अंगावर काटा आनणारा व्हिडीओ समोर

पर्यटनासाठी आलेले कुटुंब हत्तींना आंघोळ घालताना पाहत असताना घडली घटना.

पुढारी वृत्तसेवा

Elephant Fight कर्नाटकामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोडगू (coorg) जिल्ह्यातील प्रसिद्ध 'दुबारे एलिफंट कॅम्प' (Dubare Elephant Camp) येथे ही दुर्घटना झाली. याबाबात माहिती अशी की चेन्नई येथील एक कुटूंब येथे पर्यटनासाठी आले होते. येथे कावेरी नदीमध्ये पाळीव हत्तीना धुतले जाते तेच पाहण्यासाठी हे कुटुंब नदीच्या काठावर उभे होते. इतक्यात यातील एक हत्ती आक्रमक झाला व त्‍यांनी आपल्या जवळील हत्तीवर अचानक हल्ला चढवला. त्‍याला ढकलत नदीच्या काठावर आणले. यावेळी दूसरा हत्ती काठावर पडला व याच्या खाली पर्यटक महिला सापडली.

अंगावर काटा आणनारा व्हिडीओ समोर

या हत्तीखाली सापडलेल्या महिलेला बाहेर पडण्यास वाव मिळाला नाही. तोपर्यंत आक्रमक झालेल्या हत्तीने पुन्हा पडलेल्या हत्तीवर जोरदार हल्ला चढवला. त्‍याला घसटत पुढे यात ती महीला पाण्यात खाली घसटत गेली यातच तिचा मृत्‍यू झाला. यावेळी तिचा पती लहान मुलाला कडेवर घेऊन तिला बाहेर ओढण्याचा प्रयत्‍न करतो पण. त्‍या महिलेला बाहेर पडता येत नाही यातच तिचा अंत होतो.

माहूत पाठीवर असूनही हत्ती कंट्रोलच्या बाहेर

दुबारे कॅम्पमध्ये कावेरी नदीच्या पात्रात पाळीव हत्तींना अंघोळ घालण्याची वेळ सुरू होती. अनेक पर्यटक ते पहात असतात व्हिडीओत दिसत आहेत की त्‍या हत्तीवरील माहूल त्‍याला कंट्रोल करण्यासाठी खूप प्रयत्‍न करतो. पण आक्रमक हत्ती आपल्या सुळयांनी समोरच्या हत्तीवर वार करत ढकलत पुढे नेतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT