राष्ट्रीय

भाजपला किती जागा मिळतील? योगी आदित्यनाथांचा मोठा दावा

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : संविधानाचा गळा घोटण्याचे काम काँग्रेसने आणीबाणीच्या माध्यमातून केले आहे, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, "संविधानाचा गळा घोटण्याचे काम काँग्रेसने आणीबाणीच्या माध्यमातून केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जाऊन, तत्कालीन काँग्रेस सरकारने बळजबरीने घटनेत कलम ३७० समाविष्ट केले. हा देश डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेवर चालेल. हा देश पर्सनल लॉ किंवा शरिया कायद्यावर चालणार नाही.

पुढे बोलताना ते असेही म्हणाले की,  "आज '४०० पार' हा सामान्य माणसाचा मंत्र बनला आहे. सगळीकडे तुम्हाला 'फिर एक बार मोदी सरकार- अबकी बार ४०० पार' हेच ऐकू येईल. हे अचानक घडलेले नाही. तर गेल्या १० वर्षात देशातील प्रत्येक क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे ४ जूनला भाजप-एनडीए '४०० पार'चे लक्ष्य पूर्ण करेल."

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT