नवी दिल्ली : 'काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांच्या मानवाधिकाराबाबत बोलतो,' असे म्हणत भाजप नेते खा. रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. लोकसभेत संविधानावर चर्चा सुरू होती. यावेळी भाजपकडून रविशंकर प्रसाद बोलत होते. रविशंकर प्रसाद म्हणाले की, काँग्रेस पक्ष अफजल गुरूच्या मानवी हक्कांबद्दल बोलतो तर आम्ही देशासाठी शहीद झालेल्यांच्या मानवाधिकार्याबद्दल बोलतो.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, “संसद हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. संविधानात संवादाला महत्व आहे. आम्ही विरोधकांचे ऐकतो. पंतप्रधान येतील तेव्हा विरोधकांनीही त्यांना ऐकावे, मागे हटू नये. निवडणुका आम्हीही हरलो, कमजोर झालो. महाराष्ट्रात आम्हाला जो विजय मिळाला एवढा मोठा विजय १९७१ नंतर आजपर्यंत कुणालाही मिळालेला नाही, हे समजून घेतले पाहिजे. हरियाणामध्ये आम्ही तिसऱ्यांदा जिंकलो. याचा अर्थ असा की, जो चांगले काम करेल तो एक-दोनदा नव्हे तर तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल, असे जनतेला वाटते, असेही प्रसाद म्हणाले.