Rahul Gandhi  
राष्ट्रीय

INDIA Bloc Protest | आंदोलनाला दांडी मारणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून तपासणी, राहुल गांधींच्या सूचना 

पुढारी वृत्तसेवा

Congress Absent MPs Show Cause

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने सलग ३ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून सर्व खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर वरिष्ठ नेतृत्वाकडून तिन्ही दिवस कोणते खासदार उपस्थित होते आणि कोणते नव्हते याची तपासणी केली जात आहे.

जे खासदार उपस्थित नव्हते त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाणार असल्याचे समजते. यामध्ये अती महत्वाचे कारण असल्याशिवाय गैरहजर राहणाऱ्या खासदारांना खुद्द राहुल गांधींनी या विषयात लक्ष घातले असून याबाबतचा अहवाल संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याकडून मागवला असल्याचे समजते. 

कोणते खासदार किती दिवस दिल्लीत?

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, श्यामकुमार बर्वे, प्रशांत पडोळे, गोवाल पाडवी, शिवाजी काळगे आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून दिल्लीत आहेत. प्रणिती शिंदे, डॉ. कल्याण काळे, रविंद्र चव्हाण मंगळवारी आणि गुरुवारी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, त्या बुधवारी एमपीएससीच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या व्यतिरिक्त खासदार शाहू महाराज, प्रतिभा धानोरकर, ⁠शोभा बच्छाव मंगळवारी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तर डॉ. नामदेव किरसान, बळवंत वानखेडे, विशाल पाटील हे एकही दिवस आंदोलनाला उपस्थित नव्हते. 

उपस्थिती खासदारांसह अनुपस्थितांकडे राहुल गांधींचे लक्ष 

देशभरात काँग्रेसचे शंभर खासदार आहेत. या शंभर खासदारांपैकी किती खासदार आंदोलनाला पहिल्या दिवसापासून उपस्थित होते आणि किती नव्हते, प्रत्येक खासदाराची किती दिवस उपस्थिती होती, या सगळ्या गोष्टींकडे स्वतः राहुल गांधी लक्ष देऊन आहेत. जे जे खासदार उपस्थित नव्हते त्यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कान टोचल्याचे समजते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT