राष्ट्रीय

जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशावरून मल्लिकार्जून खरगे म्हणाले…

Pudhari News

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा ; उत्तर प्रदेशमध्ये ज्योतीरादित्य शिंदे यांच्यानंतर माजी केंद्रीय मंत्री जितीनप्रसाद यांनी काँग्रेससोबत काडीमोड घेतला. जितीनप्रसाद यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसला धक्का बसला आहे. दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की जाणारे जात आहेत त्यांना आम्ही रोखू शकत नाही.

अधिक वाचा : खरीप हंगामातील पिकांसाठी किमान हमीभाव जाहीर

जितिन प्रसाद यांच्या भाजपमध्ये प्रवेशावर खरगे म्हणाले, जाणारे जात असतात, आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. हा त्यांचा निर्णय आहे, त्यांचेही काँग्रेसमध्ये भविष्य आहे. जे काही झाले ते दुर्दैवी आहे.

काँग्रेसला मोठा धक्का – कुलदीप बिश्नोई

तर दुसरीकडे काँग्रेसचे कुलदीप बिश्नोई यांनी माजी केंद्रीय मंत्री जितीनप्रसाद यांच्या भाजपमध्ये सामील होणे म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का आहे. पक्षाने राज्यातील लोकांच्या नेत्यांची ओळख मजबूत करण्याची  गरज आहे. हरियाणाचे ज्येष्ठ नेते बिश्नोई ट्विट करत म्हणाले 'आधी ज्योतिरादित्य शिंदे… आता जितीनप्रसाद… काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT