पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Source X
राष्ट्रीय

आणीबाणी लादून संविधानावर सर्वात मोठा हल्‍ला काँग्रेसनेच केला : नरेंद्र मोदी यांचा हल्‍लाबोल

PM Narendra Modi | लोकसभेमध्ये संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्‍याच्या निमित्ताने चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संविधानाला २५ वर्षे लागली तेव्हा देशात आणिबाणी लावण्यात आली, हा संविधानावील सर्वात मोठा हल्‍ला होता. इंदिरा गांधी यांनी संविधानाची मुस्‍कटदाबी केली. सध्या एका कुंटूंबाने काँग्रेस पक्षावर कब्‍जा केला आहे. सत्तेची भूक हाच काँग्रेसचा इतिहास, काँग्रेसने विविधतेत विराधोभास शोधला, त्‍यांच्या काळात देशाच्या एकतेवर अनेक हल्‍ले झाले आहेत. अशा शब्‍दात आज पंतप्रधान मोदी यांनी काँगेसवर हल्‍ला चढविला. लोकसभेमध्ये संविधानाला ७५ वर्षे झाल्‍याच्या निमित्ताने चर्चा सुरु आहे. त्‍यावेळी मोदी बोलत होते.

पुढे त्‍यांनी आपल्‍या भाषणात विविध मुद्यांना स्‍पर्श केला. भारताला लोकशाहीची जननी म्‍हणून ओळखंल जात. ही देशासाठी सन्मानाची बाब आहे. जेव्हा संविधानला ५० वर्षे लागली तेव्हा अटलबिहारी वाजपेयींनी देशाला एकतेचा संदेश दिला. आणि आता संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत अशावेळी आम्‍ही गेल्‍या दहा वर्षात संविधान बळकट केले. भाजपा सरकारने या देशातल्‍या सामान्य लोकांसाठी वन नेशन वन हेल्‍थ कार्ड, त्‍याचबरोबर वन नेशन वन रेशन, यासारख्या सामान्यांसाठी अनेक कल्‍याणकारी योजना आणल्‍या.

काँग्रेसच्या काळात सांविधानीक व्यवस्‍थांची मुस्‍कटदाबी झाली होती. काँग्रेसच्या एका कुटुंबाकडून संविधानाला वारंवार धक्‍का पोहचवला गेला.त्‍यांनी केलेल्‍या पापाला कोणीही माफ करणार नाही मनमोहन सिंग यांनी काढलेला आदेश राहूल गांधी यांनी फाडला हा संविधानाचा अपमान नाही का ? असा सवाल मोदी यांनी उपस्‍थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT