जयराम रमेश ( संग्रहित छायाचित्र ) File Photo
राष्ट्रीय

'सॅम पित्रोदा यांचे चीनवरील विधान हे काँग्रेसचे मत नाही'

पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांची स्‍पष्‍टोक्‍ती

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सॅम पित्रोदा यांचे चीनवरील विधानावर हे पक्षाचे मत नाही, असे काँग्रेसने स्‍पष्‍ट केले आहे. ( Sam Pitroda's China remarks)

सॅम पित्रोदा यांनी चीनबद्दल व्यक्त केलेले विचार निश्चितच राष्ट्रीय काँग्रेसचे विचार नाहीत.चीन हे आमचे परराष्ट्र धोरण, बाह्य सुरक्षा आणि आर्थिक आव्हान आहे. काँग्रेसने मोदी सरकारच्या चीनबद्दलच्या दृष्टिकोनावर वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. १९ जून २०२० रोजी पंतप्रधानांनी त्यांना जाहीर क्लीन चिट दिली होती. चीनबद्दल आमचे सर्वात अलीकडील विधान २८ जानेवारी २०२५ रोजी होते. संसदेमध्‍येही चर्चा करण्याची आणि या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी सामूहिक संकल्प व्यक्त करण्याची संधी नाकारली जात आहे हे देखील अत्यंत खेदजनक आहे, अशी पोस्‍ट काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म एक्स वर केली आहे.

काय म्‍हणाले होते काँग्रेस नेते सॅम पित्रोदा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील भेटीबद्दल विचारलेल्‍या प्रश्‍नावर 'आयएएनएस'शी बोलताना सॅम पित्रोदा म्‍हणाले की, "चीनकडून काय धोका आहे हे मला समजत नाही. मला वाटतं की हा मुद्दा नेहमीच जास्त प्रमाणात उचलला जातो कारण अमेरिकेचा स्वभाव शत्रूंना लक्ष्य करण्याचा आहे. मला वाटतं आता वेळ आली आहे जेव्हा सर्व देशांनी एकत्र यावे आणि संघर्ष करू नये."

चीन आपला शत्रू आहे, असे मानणे थांबवावे

चीनबरोबर आमचा दृष्टिकोन सुरुवातीपासूनच संघर्षाचा राहिला आहे. या दृष्टिकोनामुळे शत्रू निर्माण होतात. त्या बदल्यात, देशांतर्गत पाठिंबा मिळतो. आपल्याला ही मानसिकता बदलावी लागेल आणि पहिल्या दिवसापासून चीन आपला शत्रू आहे, असे मानणे थांबवावे लागेल. हे चुकीचे आहे आणि फक्त चीनमध्येच नाही, तर हे सर्वांमध्येच चुकीचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT