राष्ट्रीय

‘खोटं बोलण्यासाठी पीएम मोदींना नोबेल मिळायला हवं’

Pudhari News

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : इटालियन खलाशांनी केरळच्या दोन मासेमारांना केरळच्या किनाऱ्याजवळ मारुन टाकल्याच्या प्रकरणावर सुरू असलेला खटला बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावरुनच आता काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'खोटं बोलण्यासाठी मोदींना नोबेल मिळायला हवं', अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

वाचा : प्रशांत किशोर-शरद पवार भेट; २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या प्रतिस्पर्ध्यांना तारणार का?

फेब्रुवारी २०१२ मध्ये केरळच्या किनाऱ्याजवळ दोन मासेमारांना मारुन टाकल्याचा आरोप दोन इटालियन खलाशांवर होता. २०१४ मध्ये या प्रकरणी नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने भारतातील ही सुनावणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात इटलीच्या कायद्यानुसार कारवाई होणार आहे. 

वाचा : 'कोव्हॅक्सिन'मध्ये गायीच्या वासराचे सिरम नावालाही नाही

२०१४ पूर्वी नरेंद्र मोदी यांनी ही कारवाई सौम्यप्रकारे चालली असल्याची टीका सोनिया गांधींवर केली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर भाजप सरकारने मौन बाळगल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी मोदींवर टीका केली आहे. त्यांनी मोदी यांचे जुने ट्विट व्हायरल केले आहे. त्याला उत्तर देताना दिग्विजय सिंह यांनी लिहिले आहे 'मी याबद्दल सहमत आहे, खोटं बोलण्याच्या बाबतीत मोदींना फक्त नोबेलच मिळणार नाही, तर खोट्या लोकांची जर वर्ल्ड चॅम्पियनशीप असेल तर त्यात मोदींना प्रत्येकवेळी सुवर्णपदक मिळवतील. त्यांना हरवणं अशक्य आहे.'

वाचा : खा. प्रिन्स पासवान यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT