जम्मू-काश्मीर : ओमर अब्दुल्लांच्या सरकारमध्ये सामील होणार नाही, काँग्रेसने घेतला मोठा निर्णय File Photo
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीर : ओमर अब्दुल्लांच्या सरकारमध्ये सामील होणार नाही, काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

ओमर अब्‍दुल्‍लांच्या शपथविधी सोहळ्याआधी काँग्रेसची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

जम्‍मू काश्मीर : पुढारी ऑनलाईन

जम्‍मू-काश्मीर मध्ये आज (बुधवार) ओमर अब्‍दुल्‍ला मंत्रिमंडळाचा शपथ ग्रहण सोहळा होणार आहे. ज्यामध्ये 10 कॅबिनेट मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात काँग्रेससह INDIA ब्लॉकचे अनेक दिग्गज सामील होणार आहेत. मात्र कार्यक्रमापूर्वीच या सोहळ्याची रंगत बेरंग होताना दिसत आहे. (New Omar Abdullah Govt)

वास्तविक, यापूर्वी असे बोलले जात होते की, जम्मू-काश्मीर काँग्रेसचे प्रमुख तारिक हमीद कर्रा हे देखील या मंत्रिमंडळात सामील होतील आणि मंत्रीपदाची शपथ घेतील, परंतु आता काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या पक्षाचा एकही आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार नाही पक्ष बाहेरून पाठिंबा देण्याचाही विचार करत आहे.

जम्‍मू-काश्मीर काँग्रेसचे प्रभारी भरत सिंह सोलंकी यांचे म्‍हणणे आहे की, तूर्त का नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. चर्चा पूर्ण झाल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल. बोलणे पूर्ण न झाल्यामुळे आज काँग्रेसचा एकही आमदार शपथ घेणार नाही. काँग्रेस सरकारचा भाग राहणार की बाहेरून पाठिंबा देणार, अशीही चर्चा सुरू आहे.

काँग्रेसच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने एकत्र निवडणुका लढवल्या होत्या आणि काँग्रेसही या सरकारमध्ये सहभागी होईल, असा विश्वास होता.

एनसी-काँग्रेस आघाडीला 48 जागा मिळाल्या

10 वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. 90 जागांपैकी नॅशनल कॉन्फरन्सने 42 तर काँग्रेसने 6 विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी भाजपला विधानसभेच्या 29 जागा जिंकण्यात यश आले. मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपी या निवडणुकीत चांगली कामगिरी करू शकला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT