नवी दिल्ली : काँग्रेसने राजस्थान गुजरात या प्रमुख राज्यांसह सहा राज्यांतील प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. तसेच राष्ट्रीय वॉर रुमच्या उपाध्यक्षपदाची धुरा कॅप्टन अरविंद कुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजुरी दिल्याची घोषणा काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपल यांनी केली.
राजस्थान काँग्रेसच्या महिला मोर्चाची जबाबदारी सारिका सिंग यांच्याकडे, गुजरातमध्ये गीता पटेल, गोव्यासाठी डॉ. प्रतिक्षा एन. खालप, मिझोरामच्या महिला मोर्चाची धूरा झोडिनलियानी, पुद्दुचेरीमध्ये ए. रहमाथुनीसा तर अंदमान निकोबारच्या महिला मोर्चाची जबाबदारी जुबैदा बेगम यांच्यावर सोपवण्यात आली आहे.