LPG Cylinder Price file photo
राष्ट्रीय

LPG price: मोठा दिलासा! एलपीजी सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १ ऑगस्टपासून मोठी कपात करण्यात आली आहे.

मोहन कारंडे

LPG price

नवी दिल्ली : व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १ ऑगस्टपासून मोठी कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात दिल्लीत २०२ रुपये, तर कोलकात्यात २०९ रुपयांची घट केली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नव्या दरांनुसार, १ ऑगस्टपासून कोलकात्यात १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २,८७२.५० रुपये दराने उपलब्ध होणार आहे. तर दिल्लीतही सिलिंडरच्या दरात २०२ रुपयांची कपात करण्यात आली असून व्यावसायिक ग्राहकांना याचा थेट लाभ मिळणार आहे.

विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी १ जुलैपासून दिल्लीतील १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्या बदलानंतर दिल्लीतील किरकोळ किंमत २,९३० रुपये झाली होती.

दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनी १ जुलैपासून ५ किलो फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही १३ रुपयांची कपात केली होती. या सुधारणेनंतर दिल्लीमध्ये ५ किलोचा एफटीएल सिलिंडर ८०८.५० रुपये दराने उपलब्ध आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही दिलासा नाही

व्यावसायिक वापरासाठी असलेल्या निळ्या एलपीजी सिलिंडरचे दर तेल विपणन कंपन्यांकडून सातत्याने कमी केले जात असले, तरी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर मात्र जैसे-थेच राहिले आहेत. म्हणजेच, घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर ७ जून रोजी निश्चित केलेल्या पातळीवरच कायम आहेत. परिणामी, दिल्लीमध्ये १४ किलोचा एलपीजी सिलिंडर ९४२ रुपयांना उपलब्ध आहे, तर कोलकातामध्ये त्याची किंमत ९६८ रुपयांवर स्थिर आहे. याव्यतिरिक्त, १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत ९४१.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९५७.५० रुपये इतकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT