CJP Targets IPS Sachin Sharma pudhari
राष्ट्रीय

CJP Targets IPS Sachin Sharma: दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केलं... आता कॉकरोज जनता पार्टीच्या रडारवर IPS सचिन शर्मा

Anirudha Sankpal

CJP Targets IPS Sachin Sharma: कॉकरोज जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने CJP समर्थक आज (दि. ४ सप्टेंबर) रोजी पुन्हा एकदा मोठं आंदोलन केलं. त्यांनी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर येऊन स्वयमघोषित हिंदुत्व इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज याच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात स्वतंत्र भारद्वाजने एका आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनीच्या वडिलांना मारहाण केल्याचा दावा केलाजात आहे. आंदोलकांनी या प्रकरणी दिल्ली पोलीसांविरूद्ध घोषणाबाजी करत आरोप केला की भारद्वाज विरूद्ध कडक कारवाई होत नाहीये. आझाद समाज पार्टी (काशीराम) चे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद देखील यावेळी सीजेपी समर्थकांसोबत पोलीस ठाण्याच्या परिसारात होते.

डीसीपी सचिन शर्मा रडारवर

याच दरम्यान, कॉकरोज जनता पार्टीचे संयोजक अभिजीत दिपकेने एक्सवर पोस्ट करत IPS अधिकारी डीसीपी सचिन शर्मा यांनाच रडावर घेतलं. त्याने स्वतंत्र भारद्वाजविरूद्ध कारवाई का केली जात नाही अशी विचारणा केली. त्याने थेट उच्च अधिकाऱ्यांनाच टार्गेट केलं आहे. दिपकेने सचिन शर्मा यांच्यावर थेट हल्ला करत हिंदुत्ववादी गुंडांचे समर्थन करण्याचा आरोप त्यांच्यावर केला. सचिन शर्मा यांना असं करताना लाज वाटत नाही का असं देखील दिपके म्हणाला. त्याने दोन मुलींचे आयुष्य दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला.

अभिजीत दिपके आपल्या ट्विटमध्ये लिहितो की, 'दिल्ली पोलीस आणि डीसीपी सचिन शर्मा यांना लाज वाटायला पाहिजे. त्यांनी दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. त्यांनी वर्दीचा अपमान केला आहे.' पुढच्या ट्विटमध्ये दिपके लिहितो की, डीसीपी सचिन शर्मांना हे सांगवं लागेल की संघी गुंडाला अजूनपर्यंत अटक का केलेली नाही. ते एक कट्टर संघी आहेत म्हणून त्यांनी अटक केली नाही का? ही माहिती मला त्यांच्याच विभागातील लोकांनी दिली आहे.'

दोन महिन्यापासून गुंड खुलेआम

पीडित विद्यार्थी निशू आझाद यांच्याबद्दल बोलताना दिपके यांनी अजून एक पोस्ट लिहिली, 'जब निशूच्या वडिलांवर संघी गुंडांनी हल्ला केला त्यावेळी ती रडत डीसीपी सचिन शर्मा आणि दिल्ली पोलीसांकडे गेली आणि दोषींना अटक करण्यासाठी विनंती करू लागली. मात्र दोन महिने झाले तरी हे गुंड खुलेआम फिरत आहेत. या गुन्ह्यात मदत करणाऱ्या डीसीपी सचिन शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

सचिन शर्मा हे जंतर मंतरवर झालेल्या कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी होती. ते राजकीय हिंसाचारावरून देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

नेमका वाद काय?

सोशल मीडियावर एक व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत भारद्वाज स्वतःला कट्टर हिंदू म्हणतो आणि याच व्हिडिओत तो निशू आझाद याच्या वडिलांची खोपडी फोडण्याची भाषा देखील करताना दिसतोय. या व्हिडिओत हा भारद्वाज म्हणतो की, तुम्हाला माहिती आहे का की या गुन्ह्यासाठी कोणते कलम लागते. कलम ३०७.. त्यांना ६० टाके घालावे लागले होते. ते गंभीर स्थितीत होते. त्यांची मुलगी पोलीस ठाण्याच्या बाहेर उभी होती अन् ती न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करणार असे म्हणाली होती. तरी देखील मी जेलमध्ये गेलो नाही. सगळ्या जगाला माहिती असायला पाहिजे की मी पूर्ण रात्र बाहेर फिरत होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT