ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि 'भारत रत्न' सन्मानित प्रा. सी.एन.आर. राव 
राष्ट्रीय

CNR Rao SIR Notice : 'भारत रत्न' डॉ. सी.एन.आर. राव यांना कोणतीही नोटीस नाही; निवडणूक आयोगाचा खुलासा

SIR मोहिमेअंतर्गत नावात तफावत असल्याचा ठपका ठेवून नोटीस बजावण्यात आल्याचा दावा फेटाळला

पुढारी वृत्तसेवा

CNR Rao SIR Notice : ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि 'भारत रत्न' सन्मानित प्रा. सी.एन.आर. राव यांना मतदारांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत नावात तफावत असल्याचा ठपका ठेवून नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहे. बंगळुरूतील मल्लेश्वरम मतदारसंघातील मतदार यादीच्या पुनरीक्षणादरम्यान असा कोणताही नोटीस प्रकार घडला नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

नेमका कोणता दावा करण्‍यात आला होता?

प्रा. राव यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये जुन्या आणि नव्या मतदार यादीत तफावत आढळल्याने त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आल्याचा दावा करण्यात वृत्तांमध्‍ये आला होता. पूर्वीच्या यादीत 'Prof CNR Rao' तर सध्याच्या यादीत इंग्रजीत एक extra 'f' लागून 'Proff CNR Rao' असे नोंदवले गेल्याने ही "स्व-नाव तफावत" (Self-name mismatch) मानली गेल्याचे वृत्त होते.

निवडणूक आयोगाचा खुलासा

बंगळुरू नागरी महापालिकेचे आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी महेश्वर राव यांनी या वृत्ताचा इन्कार करत अधिकृत स्पष्टीकरण जारी केले. आयोगाने दिलेल्या निवेदनानुसार, प्रा. सी.एन.आर. राव यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही.राज्य 'स्वीप' (SVEEP) नोडल अधिकारी आणि बंगळुरू पश्चिम नागरी पालिकेच्या आयुक्तांनी प्रा. राव यांच्या निवासस्थानी जाऊन अत्यंत आदराने त्यांच्याकडून 'इन्यूमरेशन फॉर्म' भरून घेतला आहे.सन २००२ च्या मल्लेश्वरम मतदारसंघाच्या मतदार यादीत भाग क्र. १२९, अनुक्रमांक ४३१ वर त्यांचे नाव 'रामा' (Rama) असे नोंदवले गेले होते.सध्या मल्लेश्वरम मतदारसंघाच्या (१५७) भाग क्र. ५९, अनुक्रमांक १८७ अंतर्गत त्यांचे नाव 'Prof. C. N. Rao M' असे नोंदवले गेले असून, त्यानुसारच प्रारूप मतदार यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

डॉ. सी.एन.आर. राव यांचे संशोधनात अद्वितीय योगदान

९२ वर्षीय प्रा. सी.एन.आर. राव हे सॉलिड-स्टेट आणि स्ट्रक्चरल केमिस्ट्री (Solid-state and structural chemistry) क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आहेत. सी.व्ही. रमण आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर 'भारत रत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे ते तिसरे शास्त्रज्ञ आहेत.त्यांनी देशाच्या विज्ञान धोरणांना दिशा देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य राहिलेल्या डॉ. राव यांनी पुढे राजीव गांधी, एच.डी. देवेगौडा, आय.के. गुजराल आणि डॉ. मनमोहन सिंग या चार प्रधामांत्र्यांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. भारतीय विज्ञान संस्था (IISc) चे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले असून जाकूर येथील 'जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च' (JNCASR) ची स्थापना त्यांनी केली. त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि 'कर्नाटक रत्न' यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT