राष्ट्रीय

CM Zoramthanga : मुख्यमंत्री झोरमथांगासमोर धर्मसंकट

अनुराधा कोरवी

पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी मिझोरामला आले तरी आपण त्याच्यासोबत फिरणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी एकप्रकारे त्याची अगणिकता दाखवून दिली आहे. मणिपूरमधील हिंसाचार व मैतेई आदिवासी समुहातून झालेल्या चर्चवरील हल्यांबद्दल मिझोरामच्या लोकांमध्ये भाजपबद्दल नाराजीची भावना आहे आणि याचमुळे मोंदीसोबत व्यासपीठावर बसण्यास झोरमथांगा यांनी नकार दिला आहे. हे उघड सत्य आहे. ( CM Zoramthanga )

मिझोराममध्ये कोट्याधीश उमेदवारांची लक्षणीय संख्या

मिझोराम विधानसभा निवडणुकीमध्ये मैदानात असलेले १७४ पैकी ११२ उमेदवार कोट्यावधीश आहेत. निवडणुका होत असल्याने अन्य राज्याच्या तुलनेत मिझोराममधील कोट्याधीश उमेदवारांची टक्केवारी लक्षणीय आहे. सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या आप नेते ॲड्यु लालरेमिकना पछाऊ यांची मालमत्ता ६९ कोटी रूपयांची आहे. ऐझवाल नॉर्थ- ३ मतदारासंघातून निवडणुक लढवत असलेले पछाऊ हे आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कॉग्रेसच्या आर. वन्लालुगा यांची संपत्ती ५५. ६ कोटी रूपये इतकी आहे. सर्चिपव मतदारसंघातून ते निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या झोराम पिपल्स मुव्हमेटच्या एच. गिझाला यांची संपत्ती ३६.९ कोटी रूपये इतकी आहे. सर्वात गरिब उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तर सर्चिप मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रामुल्हान इंडिना हे १५०० रूपयांच्या संपत्तीसह सर्वाधिक गरीब आहेत.

लेंगटेंग मतदारसंघात चुरशीची लढत

सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटच्या एल. थांगमविया यांनी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत लेंगटेंग मतदार संघात विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांनी कॉग्रसेच्या आर. रोहलुना यांनी तीन हजारांपेक्षा जास्त मंतानी पराभव केला होता. तत्पुर्वीच्या २०१३ च्या निवडणुकीत रोहलुना यांनी थांगमविया यांना पराबूत केले होते. थांगमविया आमि रोहलुना हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे यवेलच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा दबदबा राहणार याकडे राज्यातील लोकांचे लक्ष लागले आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीतून मणिपूरचे नेते गायब…

मणिपूरमदील हिंसाचारानंतर .या राज्यातल्या असंख्य ख्रिश्चन लोकांनी मिझोराम पलायन केले होते. वांशिक संघर्षामुळे जसा मणिपूरमध्ये तणाव निर्माण झाला होता, तसा काही प्रमाणात तो मिझोराममध्येही झाला होता. मिझोरामच्या निवडणुकीवर शेजारी राज्यातील हिंसाचार परिणाम दिसून येत आहेत. याचमुळे भाजपने स्टार प्रचारकांची जी यादी जाहिर केली आहे, त्यात मणिपूरमधील एकाही नेत्याचा समावेश केलेला नाही. स्टार प्रचारकांच्या यादीत मणिपूरच्या कोणत्याही नेत्याचा समावेश का करण्यात आलेल्या नाही, या मुद्यावर बहुतांश स्थानिक नेत्यांनी मौन बाळगलेले आहे. ( CM Zoramthanga )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT